व्हॉईस ऑफ मीडियाच्या ता.अ.पदी सोनटक्के का.अ.पदी बोबडेंची निवड

Spread the love

पूर्णा तालुक्यातील नुतन कार्यकारिणी जाहीर

पूर्णा(प्रतिनिधी)

येथिल व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, शहरात नुकतेच जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख,जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत गौर येथील पत्रकार नारायण सोनटक्के यांची तालुकाध्यक्षपदी तर माटेगांव येथील शिवाजी बोबडे यांची कार्याध्यक्षपदी सरचिटणीसपदी सय्यद सलीम यांची बिनविरोध निवड करण्यात आली,

व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या पूर्णा तालुका कार्यकारिणीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर नुतन कार्यकारिणी निवडीसाठी शहरात ४ एप्रिल शुक्रवारी मावळते तालुकाध्यक्ष आनंद ढोणे यांच्या नेतृत्वाखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत सर्वानुमते नवीन तालुका कार्यकारणी निवडण्यात आली .सर्व सदस्यांनी तालुका अध्यक्ष म्हणून नारायण सोनटक्के यांची तर कार्याध्यक्षपदी शिवाजी बोबडे यांची ,तर सय्यद सलीम मुन्सब यांना तालुका सरचिटणीस म्हणून मान्यता दिल्याने त्यांच्या निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब झाले.यावेळी गजानन नाईकवाडे यांना उपाध्यक्षपदी कायम करण्यात आले, कृष्णा काळे सहसरचिटणीस, नवनाथ पारवे कार्यवाहक, संजय पांचाळ कोषाध्यक्ष, शिवबाबा शिंदे संघटक, ज्ञानदेव बोबडे प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली, विष्णू चापके,सदाशिव सूर्यवंशी,मारुती देसाई,प्रदीप कदम,गोविंद मोरे, सुशील गायकवाड,नागेश नागठाणे, अनिल अहिरे आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर सर्व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करीत संघटनेचे ध्येयधोरणे, पंचसूत्री बळकटीकरणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच प्रास्ताविक आनंद ढोणे यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन नाईकवाडे यांनी केले.

You cannot copy content of this page