परभणी,नांदेड,अकोला लोहमार्गावर टिकीट तपासणी मोहीमेत ३३९ जणांना पकडले..!
पूर्णा-नांदेड लोहमार्ग पथकाची कारवाई;१४ रेल्वे तपासल्या;१ लाख ३० हजारांचा दंड वसूल
पूर्णा ता.३०(प्रतिनिधी)नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहीमेत पथकाने पूर्णा ते नांदेड मार्गावरील लिंबगाव स्थानकावर बस मधुन येऊन रेल्वे थांबवत विना टिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल ३३९ जणांना पकडून १ लाख ३० हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करत कारवाई केली आहे. याकारवाईमुळे रेल्वेने फुकटात प्रवास करणाऱ्यां प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या वतीने प्रदिप कामले यांच्या मार्गदर्शनाखाली वाणीज्य विभागाच्या एन. सुब्बा राव यांच्या नेतृत्वाखाली, ता.२८ रोजी २५ जणांच्या चमुचे एक पथक खाजगी बसने पूर्णा ,परभणी, नांदेड,सह अकोला, लोहमार्गवरील स्थानकावर भल्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास धडकले पथकाने तीन टप्प्यांत कारवाई करत तांडुर, मराठवाडा ,राज्यराणी, पनवेल, देवगीरी, एक्सप्रेस सह एकुण १४ गाड्या विविध स्थानकावर थांबवून तीन टप्प्यांत कारवाई केली.यावेळी रेल्वेतुन विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह अनधिकृत ३३९ विक्रेत्यांना पकडून दंडात्मक कारवाई केली.त्यांच्या कडून तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक दंड वसूल केला असल्याची माहिती आहे.या तपासणी मोहिमेत एन.सुब्बाराव यांच्या समवेत मुख्य तिकीट निरीक्षक ,जनरल ,०३ कमर्शियल इन्स्पेक्टर, ०२ आरपीएफ कर्मचाऱ्यांसह २५तिकीट तपासणी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.












