३५ वर्षीय महिलेवर अत्याचार;प्रकरण बीड पोलीसांकडे वर्ग

Spread the love

परभणीच्या कोतवाली पोलीसांत गुन्हा दाखल.

परभणी/प्रतिनिधी

एका ३५ वर्षीय महिलेवर लग्नाचे अमिष दाखवत वारंवार अत्याचार करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी परभणीच्या कोतवाली पोलिस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील प्रकरण बीड (सिरसाळा) पोलीसांकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती आहे.

परभणी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात पिडित ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने फिर्यादी सोबत ओळख करत तिच्या घरी जावून ती एकटी असल्याचा फायदा घेत लग्नाचे अमिष दाखवत संबंध ठेवले. सदरची घटना कोणाला सांगितली तर जीवे मारुन टाकेण, अशी धमकी देत अश्लिल शिवीगाळ केला. सध्या पिडित महिला ही परभणी शहरातील गंगाखेड रोड परिसरात वास्तव्यास आहे. पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी मुंजा व्यंकटराव लांडगे याच्यावर २१ मे रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तपासासाठी प्रकरण सिरसाळा जि. बीड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page