योगामुळे मनशांतीसह आरोग्य सुदृढ बनते – एकनाथ काळबांडे
पूर्णेतील स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात योग दिनानिमित्त योगाचे धडे
पूर्णा ता.२१ (प्रतिनिधी)
योगामुळे मनशांती आणि आरोग्य सुदृढ बनते असे प्रतिपादन योग शिक्षक एकनाथ काळबांडे यांनी केले. ते येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात योग दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या योग शिबिरात प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा.डॉ.संतोष कुर्हे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून योगशिक्षक मकरंद कुलकर्णी, महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक महाविद्यालयातील क्रीडा संचालक डॉ.भारत चापके यांनी आरोग्याच्या दृष्टीने योगाचे महत्त्व सविस्तरपणे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय कसाब यांनी केले तर आभार तत्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कीर्तनकार यांनी मानले. या योग शिबिरासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.