प्रा.सचिन ढवळे यांना प्रचंड मताने विजय करा-संतोष आघाव
प्रा.सचिन ढवळे यांना प्रचंड मताने विजय करा-संतोष आघाव
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्या बरोबरच पदवीधरांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी राज्यमंत्री तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चुभाऊ कडू यांचे हात बळकट करण्यासाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांना प्रथम क्रमांकाचे मतदान देऊन विजय करण्याचे आवाहन प्रहार सेवक संतोष आघाव यांनी केले आहे.
मराठवाड्यात कला,क्रिडा,कार्यानुभव अंशकालीन/अतिथि निदेशक व
पदवीधर विद्यार्थी हे अधिक सुशिक्षित बेकार आहेत. नेहमीच पडणारा दुष्काळ उद्योगधंद्यांचा अभाव त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. या प्रश्नावर प्रा. सचिन ढवळे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे आधिकत उमेदवार प्रा.सचिन ढवळे यांनी संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यांना भेटी दिल्या असून त्यांना पदवीधर मतदारा़चा वाढता पाठिंबा मिळत आहे. येत्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान दिवशी उमेदवार प्रा.सचिन ढवळे यान आपले प्रथम पसंतीचे मतदान करावे व विधान परिषदेवर पाठवावे असे आवाहन प्रहार जन सेवक संतोष आघाव यांनी केले आहे.