मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: आज ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्तेआ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: आज ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्तेआ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचारार्थ परळीत महाविकास आघाडीच्या वतीने आज रविवार दि.२२ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते आ.सतिष चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते व आ.संजय दौंड यांच्या उपस्थितीत रविवार दि.२२ रोजी सकाळी ११ वा. प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. इमदादुल उलुम प्राथमिक शाळा प्रांगण,पाॅवर हाउसच्यामागे परळी वैजनाथ येथे समारंभ होणार आहे. तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक अंजुमन एज्युकेशन सोसायटी व विनीत मराठवाडा पदवीधर मतदार संघ महाविकास आघाडी प्रचार समिती परळी वैजनाथ यांच्यावतीने करण्यात आले आहे.