दासोह शिष्यवृत्ती वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Spread the love

पूर्णेतील लिंगायत समाज बांधवांचा स्तृत्य उपक्रम

पुर्णा/प्रतिनिधी
मागील काही वर्षांपासून येथील लिंगायत समाज बांधवां तर्फे समाजातील  होतकरू विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी दासोह शिष्यवृत्तीचे वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.  यंदाही लिंगायत समाजातर्फे श्री गुरु बुध्दिस्वामी मठ संस्थान येथे  दासोह शिष्यवर्ती आणि गुणवंत विदयार्थी सत्कार सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अपार कष्ट, जिद्द, मेहनतीच्या जोरावर हालाखीच्या परिस्थितीत समाजातून आय आय टी नागपूर  येथे प्रवेश मिळालेल्या श्रद्धा नगरसाळे या विद्यार्थ्यांनीला २५ हजार रुपये रोख शिष्यवृती तसेच १० वी आणि १२वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना देखील गौरविण्यात आले. पूर्णा येथे सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर महाजन, सिताराम कापुसकरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ह्यावेळी समाजातील प्रतिष्ठित बांधव, प्राध्यापक, वकील, शिक्षक यांसह सर्व समाजबांधव, महिला पत्रकार, विदयार्थी यांची मोठी उपस्थिती होती.सूत्र संचालन डॉ. ऋषिकेश सोळंके व नागनाथ बिबेकर तर आभारप्रदर्शन रमेश एकलारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व लिंगायत समाज बांधव यांनी परिश्रम घेतले

You cannot copy content of this page