Parbhaniपरभणी जिल्ह्यात २२ हजार रुपयांचे देशी विदेशी मद्य जप्त

Spread the love

पूर्णा पोलिस(Purna Police) पथकाची कारवाई; दोन दुचाकीसह दोघे ताब्यात;दारुबंदी विभागाचेदुर्लक्ष

पूर्णा/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील पूर्णा(Purna)तालुक्यात दारुबंदी(Liquor Prohibition Department) विभागाच्या अधिकाऱ्यांनी  केलेल्या दुर्लक्षामुळे अवैध दारू विक्रीला अक्षरशः उधाण आले असून,येथिल पोलिस पथक कार्यवाही करत आहे.मात्र दारुबंदी विभाग कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे.स्थानिक पोलिसांनी सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी पूर्णा शहर व परिसरात अवैध धंद्या विरोधात छापेमारीची बेधड कारवाई केली.या कारवाईत सुमारे २२ हजार रुपयांचे देशी विदेशी मद्य जप्त करण्यात आले असून पोलिसांनी दोघांजणांसह एक स्कुटी ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.
       पूर्णा शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.दारु मुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी  येथिल उपविभागीय पोलिस अधिकारी(SDPO) डॉ.समाधान पाटील पोलिस निरीक्षक(Police Inspector)विलास गोबाडे हे अॅक्नन मोडवर आले आहेत.जागोजागी अवैध दारू सह अवैध धंद्यावर छापेमारी सुरू केली आहे.सोमवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्णा पोलिस ठाण्याचे सपोनि सोमनाथ शिंदे, फौजदार प्रकाश इंगोले, सपोउपनि अण्णा माने,व आमेर चाऊस, जमादार श्याम काळे,पो.काॅ.अजय माळकर आदींचे पथक पुर्णा व परिसरात  अवैध धंद्यावर कार्यवाई करिता गस्तीवर होते.दरम्यान पथकास शहरातील राजमुद्रा चौक येथून एक दुचाकीस्वार आपल्या दुचाकीवरून  बाॅक्स  घेऊन जात असताना त्या दुचाकीस्वाराला पथकाने आडवले. त्याची विचारपूस केली असता तो सोमनाथ किसनराव जोगदंड रा गौर ता.पुर्णा येथील रहिवासी असल्याचे समजले.पोलीसांनी त्याची अधीक तपासणी केली असता त्याच्या कडे असलेल्या बाॅक्स मध्ये विनापरवाना विदेशी मद्य आढळून आले.पकडण्यात आलेल्या मद्याची किंमत १६ हजार ८०० रुपये असुन पोलिसांनी त्यास  व त्यांच्या दुचाकीसह ताब्यात घेतले तसेच परिसराततील नांदेड टि पाईन्ट येथे पथकास एका स्कुटी वरुन एक तरुण देशी मद्य घेऊन जात असताना आढळून आला पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची माहिती काढली असता तो सचिन हरीदास खंदारे रा सिद्धार्थ नगर असल्याचे निदर्शनास आले.त्याने शहरातील देशी चालकांकडून सदरील दारु काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे उघडकीस आले आहे.त्याचेकडे पोलिसांना  देशी दारुच्या ७२ बाॅटल किमती ज्याचे बाजार मुल्य ५ हजार ४० रुपये असुन पोलिसांनी त्यास त्याचे स्कुटीसह ताब्यात घेतले आहे.पूर्णा पोलिस पथकाने केलेल्या कार्यवाहीत एकुण २२ हजार रुपयांचे देशी विदेशी मद्य जप्त केले असून,यासह दोन दुचाकीही जप्त केल्या आहेत.दोघांविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
________________________________________
दारुबंदी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..!
पूर्णा तालुक्यात अवैध  विनापरवाना दारू विक्री होऊ नये यासाठी जिल्हातील  दारुबंदी विभागाने दोन अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत.परंतु सदरील अधीकारी असतानाही पूर्णा शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे.तालुक्यात अवैध दारु ओसांडून वाहत असल्याचे चित्र आहे.स्थानिक पोलिस  अवैध दारू विक्री विरोधात एकापाठोपाठ एक कठोर कारवाई करत आहेत.मात्र दारुबंदी विभागाचे अधिकारी यांनी  या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.संबंधीत अधिकारी अवैध दारू विक्रीला लगाम न लावता ते ठरलेल्या महीन्याच्या तारखेला  तालुक्यात व शहरातील  दारु दुकानास सदिच्छा भेट नक्की  देतात  निघुन जातात.यामुळे तालुक्यातील महीला मंडळींचा या विभागाविरुद्ध रोष वाढत आहे.याप्रकाराकडे दारुबंदी विभागाच्या वरिष्ठांनी वेळीच  लक्ष देऊन कर्तव्यात कसूर करणा-या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई  करावी अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page