Parbhaniधक्कादायक;एकाच कुटुंबातील तीघांचा रेल्वेखाली (Susied)देहत्याग
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील घटना;आई-वडीलांसह,मुलींचेही टोकाचं पाऊल;कारण गुलदस्त्यात
Parbhani गंगाखेड(प्रतिनिधी)
गंगाखेड शहर वासीयांसाठी गुरुवार दिवस धक्कादायक(Shoking)दिवस ठरला आहे.शहरातील एका माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय शिक्षकासह त्याच्या पत्नी व २१ वर्षीय तरुण मुलीने मालवाहू रेल्वेखाली झोपून आपला देहत्याग केल्याची धक्कादायक घटना (दि.२८) नोव्हेंबर रोज रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडल्याचे उघडकीस आल्याने शहर व परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.सदरील कुटुंबीयाने एकाच वेळी नेमकी कशामुळे आत्महत्या हे मात्र नक्की समजू शकले नाही.याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मसनाजी सुभाष तुडमे (वय ४५), रंजना मसनाजी तुडमे (वय ४०) तसेच त्यांची मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २१) वर्ष असे त्या मयत कुटुंबातील तीघांची नांवे आहेत.मागील काही वर्षांपासून अहमदपूर तालुक्यातील किडनी कट्टू गावचे रहिवासी असलेले मयत शिक्षक मसनाजी सुभाष तुडमे हे गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमीक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.ते सध्या बळीराजा काॅलनी येथे राहत असत.(दि.२८) नोव्हेंबर रोज गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गंगाखेड रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या पुलाच्या शेजारी परभणीकडे जाणाऱ्या लोहमार्गावर मालवाहू रेल्वे रुळावर धावत असल्याचे पाहून तीघांनी एकत्रितपणे रेल्वे रुळावर झोपून रेल्वेखाली येत आपली जिवनयात्रा संपवली.घटनेची माहीती संबंधित रेल्वे चालकाने स्टेशन मास्तर व गंगाखेड पोलिसांना दिली.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे,पो.नि. दिपककुमार वाघमारे, स.पो.नि.सिद्धार्थ इंगळे, स.पो. नि.आदित्य लोणीकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.तिघांचे मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
तुडमे कुटुंबातील पती,पत्नीसह तरुण मुलीसोबत नेमकी अशी कोणती घटना घडली होती की,त्यांनी अगदीच टोकाचा निर्णय घेत एकत्रितपणे रेल्वेखाली येऊन आपला देहत्याग करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.याची चर्चा गंगाखेड शहरात ऐकायला मिळत आहे.याप्रकरणी गंगाखेड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो.नि.दिलीपकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे