पूर्णा तालुक्यातील एकल पालक व अनाथ मुलींना उबदार कपड्यांचे वाटप
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
परभणी येथील एचएआरसी संस्थेचा स्तुत्य उपक्रम
पूर्णा/प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांसाठी कार्य करणा-या एचएआरसी संस्थेने पुन्हा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यासह 7 सर्वच तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयच्या निवासी वसतिगृहातील आईवडिलांचे छत्र हरवलेल्या सुमारे २०० मुलींना स्वेटर्स वाटप करण्याचा मानस केला आहे. दि.२९ नोव्हेंबर रोज शुक्रवारी संस्थेच्या टीमने स्वतः जाऊन पूर्णा येथे २५ गरजुंपर्यंत मदत पोहचवली.
मागील महीन्याभरापासून सर्वत्र कडाक्याच्या थंडीने थैमान घातले आहे वाढली आहे. सध्या परभणी जिल्ह्यातील तापमान पारा १० अशांहुन खाली घसरला आहे. अशा कडाक्याच्या थंडीत शासनाच्या के जी व्ही बी वसतिगृहात शिकणाऱ्या या एकल पालक व अनाथ मुलींचे थंडी पासून बचाव व्हावे म्हणून एचएआरसी संस्थेतर्फे लोकसहभागातून ‘प्रकाशवाटा’ या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आवाहन करून यातून जमा डोनेशन मधून या 200 गरजू मुलींना स्वेटर्स देता येणार आहे याचे समाधान आहे”.या प्रसंगी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, राजेंद्र खापरे, मुख्याध्यापिका रेवता राऊत, अन्नपूर्णा पुरी व शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होते. या उपक्रमासाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, प्रा डॉ शिवा आयथळ, राजेंद्र खापरे, ऍड चंद्रकांत राजुरे, पद्मा भालेराव, विजय औंढेकर, सचिन पांढरे, भूषण नाफडे, प्रमोद इरूमले, डॉ लीना बगाडीया, विनायक शेटे, मुकुंद कुलथे आदीनी सहयोग दिला.