शासकीय धोरणचं शेतीच्या अधोगतीस जबाबदार-जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी) –
भारतीय शेतीच्या अधोगतीस सरकारी धोरणे आणि निसर्गाची अवकृपा जबाबदार आहे.त्यामुळे सेंद्रिय शेतीचे आणि व्यावसायिक शेतीचे ज्ञान अवगत करून स्त्री पुरुष समानतेने शेती व्यवसाय समृद्ध केला पाहिजे तरच ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी प्रगतीच्या वाटा चालेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व्याख्याते जगदीश जोगदंड यांनी केले.
पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कै. के .एम. देशमुख व्याख्यानमालेत पत्रकार जोगदंड ” भारतीय शेती समोरील आव्हाने व उपाय ” या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते .
पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय शेतीची परंपरा आणि आजच्या शेतीची अवस्था पाहता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती व्यवसाय कसा सक्षम होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. तरच उद्याचा ग्रामीण भागातील शेती व्यवसाय व गावगाडा सुरक्षित राहील असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्रा. डॉ. सुरेखा भोसले, प्रमुख उपस्थिती डॉ. भीमराव मानकरे, सिनेट सदस्य डॉ. विजय भोपाळे,प्रा.डॉ. संजय कसाब,प्रा.डॉ. प्रभाकर किर्तनकार, प्रा. डॉ.दिपमाला पाटोदे आदीं मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. शारदा बंडे तर आभार डॉ .प्रभाकर कीर्तनकार यांनी मांडले.याप्रसंगी व्याख्यानमालेसाठी महाविद्यालयातील आदीं प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page