२२ वर्षीय तरुणाची झाडाला गळफास लावून आत्महत्या..

Spread the love

पूर्णा तालुक्यातील सुहागन येथिल घटना; अकस्मात मृत्यूची नोंद

पूर्णा(प्रतिनिधी)

तालुक्यातील मौजे सुहागन येथे एका २२ज्ञवर्षीय तरुणाने आपल्या शेतातील आखाड्याजवळील झाडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अनिकेत संजय भोसले (वय२२) वर्ष रा.सुहागन ता.पूर्णा.जि.परभणी असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.सदरील तरुणाचे वडीलांच्या नांवे सुहागन शिवारातील गट नंबर-२४७ मध्ये शेत जमीन आहे.शेतात राहण्यासाठी आखाडा बांधलेला आहे.दि.३० नोव्हेंबर रोजी रात्री अनिकेत आखाड्यावर येऊन झोपला.दरम्याने त्याने मध्यरात्री आखाड्यात समोर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.हा प्रकार बाजुच्या आखाड्यावर असलेल्या त्याचा चुलता बापुराव भोसले यांनी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाहीला.सदरील खबर त्यांनी अनिकेतच्या वडीलांना दिली.गावातील पोलिस पाटील त्र्यंबक भोसले व काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शेत गाठले पोलीस पाटलांनी घटनेची खबर पूर्णा पोलिसांना दिली.येथिल फौजदार सुरजितसिंग माळी, सपोउपनि,आमेर चाऊस,पोहेकाॅ.श्याम कुरील यांनी घटनास्थळ धाव घेऊन झाडावर लटकत असलेला मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांना सुपूर्द केला आहे.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून त्याने कोणत्या कारणाने गळफास लावून आत्महत्या केली याची चर्चा सुहागन येथे रंगली होती.घटनेचा पुढील तपास पो.नि.विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सपोउपनि आमेर चाऊस करत आहेत.

You cannot copy content of this page