(MPSC)राजपत्रित संयुक्त पुर्व परिक्षा;परभणीत १२ केंद्रावर ३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Spread the love

परभणी(प्रतिनिधी)

परभणी शहरात मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या १२ उपकेंद्रावर (दि..१) डिसेंबर रोज रविवारी (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही मोठ्या कडेकोट बंदोबस्त शांततेत पार पडली.सकाळ व दुपारच्या सत्रात मिळून एकूण ३ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी यावेळी सहभाग नोंदविला.
राज्य सरकारने MPSC राजपत्रित अधिकारी सेवा परीक्षांसाठी परभणी मुख्यालया शहरातील जिंतूर रोड येथील ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, कै. रावसाहेब जामकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, सुभाष रोड वरील शारदा महाविद्यालय, नानलपेठ परिसरातील बालविद्या मंदिर विद्यालय,वसमत रोड येथील श्री शिवाजी महाविद्यालय व एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूल, तसेच शिवाजी नगर,कृषी सारथी काॅलनीतील गांधी विद्यालय,संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, वैभव नगरातील बालविद्या मंदिर हायस्कुल,कारेगांव रोड ममता काॅलनी भारतीय बालविद्या मंदिर, खानापूर फाटा कै. मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर,सुपर कार्पेट जवळ,वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, येथे केंद्र तयार केले होते.सकाळच्या सत्रात सकाळी १० ते १२वाजता १९८७ विध्यार्थी उपस्थित तर १०२० अनुउपस्थित होते तर  दुपारच्या सत्रात १९७२ उपस्थिती तर १०३५ विध्यार्थी अनुपस्थिती होते.
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप परीक्षा प्रमुख म्हणून निवास उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी,भरारी पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, अभि रक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये परीक्षा पार पडली.भरारी पथक प्रमुख जीवराज डापकर यांनी सर्व परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परीक्षा केंद्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परीक्षा यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर प्रदीप मुनेश्वर, विकास सायगुंडे यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page