परळी(वै)रा.काँ.पक्षाच्या विधानसभा अध्यक्षपदी गोविंदराव देशमुख यांची फेर निवड

Spread the love

परळी तालुका अध्यक्षपदी वैजनाथराव सोळंके, शहराध्यक्षपदी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची वर्णी;बीड येथील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, मा.मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

बीड ता.२० (प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परळी विधानसभा अध्यक्षपदी धनंजय मुंडे यांचे विश्वासू गोविंदराव देशमुख यांची आज पुन्हा एकदा फेर नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वैजनाथराव सोळंके व शहराध्यक्षपदी बाजीराव भैया धर्माधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिका-यांचा संवाद मेळावा पार पडला.यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ रूपालीताई चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आ. संजय भाऊ दौंड, माजी आ.बाळासाहेब आजबे,युवा नेते अजय मुंडे, यांसह आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी खा.सुनील तटकरे तसेच मा. मंत्री तथा आ.धनंजय मुंडे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नव्याने नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर ही पदे रिक्त होती. दरम्यान आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता धनंजय मुंडे यांच्या टीम मधील त्यांचे विश्वासू गोविंदराव देशमुख यांच्यासह वैजनाथराव सोळंके व बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली असून याबद्दल धनंजय मुंडे यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page