पुर्णेत सोमवारी तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा..!

Spread the love

पूर्णा ता.२६(प्रतिनिधी) –bullock cart march in Purna on Monday News;परभणी जिल्ह्यात विमा कंपन्यांनी लावलेल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पुर्णा तहसील कार्यालयावर सोमवारी (ता. २९ सप्टेंबर) रोजी सकाळी ११ वाजता ताईकळस टी-पॉईंट, पूर्णा येथून भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आयोजन सर्व पक्षीय, शेतकरी संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवहार सोनटक्के यांनी दिली आहे.

विमा कंपन्यांच्या जाचक अटी रद्द करून टाकाव्यात,सरसकट ओला-दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,आजाराने किंवा अपघाताने दगावलेल्या जनावरांना तातडीची मदत द्यावी,शेतीकामासाठी रोजगार हमी योजनेतून काम उपलब्ध करून द्यावे,शेतकऱ्यांच्या गोठ्यांचा प्रश्न मार्गी लावून तातडीने गायी-गोठे द्यावेत.

पूर्णा तालुका दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध असून, दुधावरच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका मोर्चादरम्यान मांडली जाणार आहे.आयोजकांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले असून, “अभी नहीं तो कभी नहीं” या घोषवाक्याखाली मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शिवहार सोनटक्के, नरेश जोगडंण, माणिक सूर्यवंशी, मुळुजी जोगडंण तसेच सर्व राजकीय पक्ष व शेतकरी संघटना, पुर्णा तालुका यांनी केले आहे.मोर्चाला येताना शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याची पावती, बँक पासबुक व आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page