Maratha Reservation News:अंबाजोगाईतील सुगांव पाठोपाठ आहेरवडगावच्या तरुणाचीही आत्महत्या

Spread the love

अंबाजोगाई ता.२(प्रतिनिधी):Beed Ambajigai Newsबीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या सुगांव पाठोपाठ आहेरवडगाव गावातून दुर्दैवी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Demand) एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून तर एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नितीन माणिकराव चव्हाण,ता.सुगांव या.अंबेजोगाई तर भरत खरसाडे रा.आहेरवडगांव जि.बीड असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनातून कोणताही तोडगा निघत नसल्याने आलेल्या नैराश्यातून नितीन माणिकराव चव्हाण या तरुणाने बीड जिल्ह्यातील सुगांव गावात आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तर भरत खरसाडे याने आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने तसेच मुंबई आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाता आले नसल्याने विषारी औषध प्राशन केल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.आत्महत्येची माहिती देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दोन्ही गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नितीन चव्हाणने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे कळताच मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेले सुमारे ७० ते ८० तरुण तातडीने सुगाव गावाकडे परत निघाले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

मंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबईचा’ नारा दिल्यानंतर प्रत्येक मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाला. मात्र बीडच्या आहेरवडगाव येथील भरत खरसाडे या तरुणाला मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायची तीव्र इच्छा होती. मुंबईला जाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडिलांनी पैसे दिलेच नाही. या नैराश्यात तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे.आतापर्यंत आंदोलनादरम्यान जीव गमवावा लागल्याची ही तिसरी दु:खद घटना आहे.

You cannot copy content of this page