परळीतील मुरमुरे चिवडावाले महारुद्र क्षीरसागर यांचे हृदयविकाराने निधन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – परळी शहरातील सुप्रसिद्ध सखाराम मुरमुरे चिवडावाले परिवारातील वारसदार व लोकप्रिय व्यावसायिक महारुद्र सखाराम क्षीरसागर (वय ५०) यांचे मंगळवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
दिवंगत सखाराम मुरमुरे चिवडावाले यांच्या चिवड्याच्या व्यवसायाला पुढे नेत महारुद्र क्षीरसागर यांनी अनेक वर्षे परळीत मुरमुरे चिवड्याचा व्यवसाय यशस्वीपणे चालवला. त्यांच्या चिवड्याची खास चव आणि उत्कृष्ट गुणवत्ता यामुळे “सखाराम मुरमुरे चिवडा” हे नाव परळी आणि परिसरात लोकप्रिय झाले होते.
महारुद्र क्षीरसागर यांच्या निधनाने परळी शहरातील व्यापारी व सामाजिक वर्तुळात दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर अंतिम संस्कार वीरशैव लिंगायत कैलासधाम स्मशानभूमी येथे करण्यात आले. अंत्यविधीप्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












