Beed Crime : ६ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणारा नराधमाला बेड्या

Spread the love

परळी रेल्वे स्थानक परिसरात घडली होती घटना;

परळी.ता.२(प्रतिनिधी):Beed Crime News : बीड जिल्ह्यातील परळी रेल्वे स्थानकावर ६ वर्षांच्या लहान चिमुकलीवर अत्याचार (Parali Railway Station Crime) झाल्याची धक्कादायक घटना (ता.३०) रोजी घडल्याचे घडकीस आले होती, या प्रकरणानंतर परळीत संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला फाशीची मागणी केली जात आहे. अशातच परळीच्या संभाजीनगर पोलीसांनी सीसीटीव्ही व्हिडीओमधून (Parali Railway Station CCTV) आरोपीची ओळख पटवली असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

परळी रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कु-कृत्य करणाऱ्या नराधामाचा शोध सुरू केला होता.रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते. यामध्ये सदर आरोपी बालिकेला सोबत घेऊन जाताना दिसून आला होता, त्यानुसार परळी शहरातील बरकतनगर भागातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

रेल्वे स्टेशनवर नेमकं काय झालं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पंढरपूर येथून एक कुटुंब मुलांसह परळी रेल्वे स्थानकावर आले होते. दुपारी साधारण तीनच्या सुमारास त्यांनी रेल्वे स्टेशनवरच जेवण करून थोडा वेळ विश्रांती घेतली. त्याचवेळी एका नराधमाने सहा वर्षांच्या चिमुकलीला फसवून स्थानकावरील उड्डाणपुलाकडे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अत्याचारानंतर आरोपी पसार झाला होता.

You cannot copy content of this page