Parali; मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते “बाजीराव पेट्रोलियम पेट्रोल पंपाचे”शनिवारी उद्घाटन..!
परळी वैजनाथ ता.२५ (प्रतिनिधी)
परळी शहराच्या सेवा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा अत्याधुनिक असा “बाजीराव पेट्रोलियम” हा नवीन पेट्रोल पंप येत्या शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३१ वाजता शुभारंभ सोहळा राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी शांतिब्रह्म गुरुवर्य प.पू. महादेव महाराज चाकरवाडीकर, प.पू. अमृताश्रम स्वामी आणि १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाचे आध्यात्मिक सान्निध्य लाभणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली.
ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराजवळ, परळी–नंदगौळ–पुस–बर्दापूर रोडवर श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर उभारण्यात आलेल्या या पंपावर ग्राहकांसाठी २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार आहे. तसेच भारत पेट्रोलियमच्या या अत्याधुनिक पंपावर आधुनिक सुविधा ग्राहकांना पुरवल्या जाणार आहेत.
उद्घाटन प्रसंगी भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी – अहिल्यानगर विभागाचे टेरिटरी मॅनेजर मनोज जगताप, बीडचे वरिष्ठ व्यवस्थापक नीलेश नरखेडे, सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार, टेरिटरी को-ऑर्डिनेटर कीर्ती सिंघानी आणि सोलापूरचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन रावत उपस्थित राहणार आहेत.या नव्या सेवा व्यवसायाच्या शुभारंभ सोहळ्याला परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन “बाजीराव पेट्रोलियम”चे प्रोप्रायटर, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, हरिहर धर्माधिकारी, अॅड. प्रताप धर्माधिकारी व परिवार यांनी केले आहे.












