गंगाखेड–वडगांव निळा रेल्वे मार्गावर ट्रॅक दुरुस्ती; काही गाड्या रद्द तर अंशतः रद्द,वाहतुकीतही बदल
पुर्णा,ता.२८सप्टेंबर (प्रतिनिधी) दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागांतर्गत गंगाखेड – वडगाव निळा दरम्यान ट्रॅक बसविण्याचे काम सुरू असल्याने अनेक गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये रद्दीकरण, आंशिक रद्दीकरण, मार्गबदल तसेच वेळेत बदल करण्यात आला आहे.
परभणी ते परळी लोहमार्गावर (ता.२७) रोजी शनिवारी वडगांव निळा स्टेशन परिसरात रेल्वे रुळ खचल्याची घटना घडली होती.रेल्वे प्रशासनाने सायं पर्यंत डागडुजी करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याने आणखी काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे.यामार्गावरुन धावणाऱ्या पुर्णा-हैद्राबाद, नांदेड-बेंगलोर, पंढरपूर-निझामबाद,परळी-पुर्णा,अदीलाबाद, अकोला, तसेच छत्रपती संभाजीनगर नगरकडे धावण्या-या गाड्यांच्या सेवेवर परिणाम झाला आहे.काही गाड्या पुर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
🚫 पूर्ण रद्द गाड्या (Cancellation)
- गाडी क्र. 17648 – पूर्णा–हैदराबाद – दिनांक 28.09.2025
- गाडी क्र. 11414 – पंढरपूर–निजामाबाद – दिनांक 28.09.2025
- गाडी क्र. 17647 – हैदराबाद–पूर्णा – दिनांक 28.09.2025
- गाडी क्र. 57657 – पूर्णा–परळी – दिनांक 28.09.2025
- गाडी क्र. 57658 – परळी–पूर्णा – दिनांक 28.09.2025
- गाडी क्र. 11413 – निजामाबाद–पंढरपूर – दिनांक 28.09.2025
- गाडी क्र. 11414 – पंढरपूर–निजामाबाद – दिनांक 29.09.2025
🚈 आंशिक रद्द गाड्या (Partial Cancellations)
- गाडी क्र. 17647 – हैदराबाद–पूर्णा (आंशिक रद्द : वडगाव निळा–पूर्णा) – 27.09.2025
- गाडी क्र. 16593 – बेंगळुरू–नांदेड (आंशिक रद्द : परळी–नांदेड) – 26.09.2025
- गाडी क्र. 16594 – नांदेड–बेंगळुरू (आंशिक रद्द : नांदेड–परळी) – 28.09.2025
- गाडी क्र. 11413 – निजामाबाद–पंढरपूर (आंशिक रद्द : गंगाखेड–पंढरपूर) – 27.09.2025
- गाडी क्र. 57654 – हैदराबाद–परळी (आंशिक रद्द : पूर्णा–परळी) – 28.09.2025
- गाडी क्र. 57655 – परळी–अकोला (आंशिक रद्द : परळी–परभणी) – 28.09.2025
- गाडी क्र. 16593 – बेंगळुरू–नांदेड (आंशिक रद्द : परळी–नांदेड) – 27.09.2025
🔀 मार्गबदल (Diversions)
- गाडी क्र. 17614 – नांदेड–पनवेल – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : परभणी–मनमाड–अंकाई–दौंड
- गाडी क्र. 17254 – औरंगाबाद–गुंटूर – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : परभणी–मुधखेड–सिकंदराबाद
- गाडी क्र. 17001 – सिकंदराबाद–साईनगर शिर्डी – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : परभणी–मुधखेड–सिकंदराबाद
- गाडी क्र. 11403 – नागपूर–कोल्हापूर – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : परभणी–मनमाड–कुर्डुवाडी
- गाडी क्र. 17206 – काकीनाडा–साईनगर शिर्डी – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : परळी–लातूर रोड–दौंड
- गाडी क्र. 11406 – अमरावती–पुणे – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : परभणी–मनमाड–दौंड
- गाडी क्र. 17253 – गुंटूर–औरंगाबाद – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : विकाराबाद–सिकंदराबाद
- गाडी क्र. 17613 – पनवेल–नांदेड – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : लातूर रोड–विकाराबाद–सिकंदराबाद–मलकाजगिरी–निजामाबाद–मुधखेड
- गाडी क्र. 17622 – तिरुपती–औरंगाबाद – दिनांक 27.09.2025 पर्यायी मार्ग : विकाराबाद–सिकंदराबाद–निजामाबाद–मुधखेड
⏰ वेळेत बदल (Reschedule)
- गाडी क्र. 17630 – नांदेड–पुणे – दिनांक 28.09.2025 नांदेड येथून सुटण्याची वेळ 120 मिनिटांनी उशीराने, नवी वेळ 17:30 वाजता
प्रवाशांना सूचना
रेल्वे प्रशासन प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे. प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती स्थानकातील सूचना फलक, सार्वजनिक पत्ता प्रणाली, रेल्वे हेल्पलाईन तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घ्यावी..












