गंगाखेड मध्ये मविआचे उमेदवार विशाल कदम यांचे आज शक्तिप्रदर्शन.!
खा.संजय(बंडू)जाधव,खा.फौजिया खान,माजीमंत्री सुरेशराव वरपुडकर,आ.डॉ.राहुल पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
विशेष/प्रतिनिधी(गंगाखेड मतदारसंघ)
सामान्य जनता,शेतकरी, व्यापारी, सुशिक्षीत बेरोजगारांसह शेतमजुरांच्या न्यायहक्कासाठी सदैव झगडणारे तसेच संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गट, काँग्रेस,शिवसेना(उद्धव ठाकरे)गट व मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी दि.२८ ऑक्टोंबर रोजी खा.संजय(बंडू)जाधव, खा. फौजिया खान,माजीमंत्री सुरेशराव वरपुडकर,आ.डॉ.राहुल पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीसह विशालकाय जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मतदार संघातील तमान जनतेने अर्ज दाखल करण्यासाठी गंगाखेड येथील बालाजी मंदिर या ठिकाणी सकाळी ११ वाजता उपस्थित राहुन आपले आर्शिवाद द्यावे असे आवाहन विशाल कदम यांनी केले आहे.
गंगाखेड मतदार संघात मविआकडून शिवसेना (उबाठा)गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, सोमवारी २८ रोजी मविआचे उमेदवार विशाल कदम हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गंगाखेड शहरातील बालाजी मंदिर येथून सकाळी ११ वाजता.ही रॅली शहातील मुख्य मार्गाने उपविभागीय कार्यालय पर्यंत जाणार आहे.रॅलीत यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे नेते खा.संजय(बंडू)जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.श्रीमती फौजिया खान,काँग्रेसचे माजीमंत्री सुरेशराव वरपुडकर,आ.डॉ.राहुल पाटील, आदींसह मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी,शिवसेना मित्र पक्षाचे आजी माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.गंगाखेड या ठिकाणी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभुमीवर होत असलेल्या रॅली व सभेसाठी महाविकास आघाडीतील सर्व विभाग, सेल, शाखातील पदाधिकारी, लोकप्रतीनीधी कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उमेदवार विशाल कदम यांच्यासह मविकास आघाडीच्या पदाधिका-यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मविआचे उमेदवार विशाल कदम यांच्या बाबतीत
नगरसेवक,बाजार समीती संचालक,नगराध्यक्षपद ते शिवसेना जिल्हाप्रमुख पदी विराजमान होत गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात शिरकाव करणा-या विशाल कदम यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा जनसामाण्यांच्या मनात उमटविला आहे.यापुर्वी त्यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुक लढविली होती. त्यांना अल्प मतांच्या फरकाने पराभावाचा सामानाही करावा लागला होता. मात्र पराभवाने खचुन न जाता सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी गोरगरीब जनतेसाठी स्वतःला झोकुन देणारा लढवया व सर्वसामान्यांच्या कामासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारा युवा नेता म्हणुन विशाल कदम यांची ख्याती आहे.
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय