कस्तुरबा गांधी विद्यालयातील २१६ विद्यार्थ्यांना ड्रेस व फराळाचे वाटप..
पूर्णा शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांची दिवाळी गोड
पूर्णा/प्रतिनिधी
येथिल गटसाधन केंद्राअंतर्गत येणाऱ्या गटशिक्षणाधिकारी त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने कस्तुरबा गांधी विद्यालयातील तब्बल २१६ विद्यार्थ्यांना मनपसंत ड्रेस व फराळाचे वाटप करण्यात आले आहे.
पूर्णा तालुक्यातील कस्तुरबा बालिका विद्यालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान शिकत असलेल्या गोरगरीब विद्यार्थींनींची दिवाळी गोड व्हावी यासाठी येथिल गट शिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांनी एक दिवाळी आनंदाची हा सुत्य उपक्रम हाती घेतला. त्यास शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. जमवलेल्या रक्कमेतुन तब्बल २१६ विद्यार्थींनींना आवडता ड्रेस व फराळाच्या किटचे वाटप गटशिक्षणाधिकारी बालाजी कापसीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना कापसीकर म्हणाले की,निरागस लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद हा शोधून न सापडणारा आहे.हा आनंद पहावयास मिळाला तो केवळ माझ्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमुल्य योगदानामुळे निर्माण झाला आहे.असेही ते म्हणाले.यावेळी येथिल शिक्षण विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












