पुर्णेत धनगर समाजाचे जोरदार धरणे आंदोलन; “आरक्षण द्या,नाहीतर तीव्र आंदोलनाचा ईशारा”

Spread the love

पूर्णा ता.२६ (प्रतिनिधी) सकल धनगर समाजाला अनुसूचित जमातींचे आरक्षण तात्काळ लागू करुन त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी,जालना येथे उपोषणाला बसलेले दिपक बो-हाडे यांचं उपोषण त्वरित सोडवावेत अन्यथा धनगर समाज बांधव रस्त्तीयावर उतरुन तिव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देत सकल धनगर समाज, तालुका पूर्णा (जि. परभणी) यांच्या वतीने येथिल तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (ता.२६) रोजी धरणे आंदोलन करुन तहसीलदार बोथिकर यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजास ST आरक्षणाबाबत वचन दिले होते. मात्र आजवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे दिपक बो-हाडे हे १७ सप्टेंबरपासून जालना येथे आमरण उपोषणास बसले असून, आज त्यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे.

निवेदनात दोन दिवसांत आरक्षणाचा निर्णय घ्यावा आणि उपोषणकर्त्याचे उपोषण तातडीने सोडवावे जीवित वाचवावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.तहसिल कार्यालयासमोर पार पडलेल्या धरणे आंदोलना वेळी पुर्णा तालुक्यातील व शहरातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page