विधानसभा निवडणूकीतून १३ उमेदवारांची माघार

Spread the love

गंगाखेड;निवडणूक लढवण्यासाठी १२ जणं मैदानात

पूर्णा/प्रतिनिधी
अर्ज उचलण्याच्या अखेरच्या दिवशी गंगाखेड विधानसभा मतदार संघ निवडणूकीच्या रिंगणातून १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने मविआचे विशाल कदम,महायूतीचे आ. डॉ.रत्नाकर गुट्टे,वंचित बहुजन आघाडीचे मा. आ. सितारामजी घनदाट ,मनसेचे रुपेश देशमुख(सोनटक्के) या प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह एकुण १२ जणं निवडणुक लढवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तीन तुल्यबळ उमेदवार या मतदारसंघात निवडणुक लढवण्यासाठी सज्ज झाले असल्याने ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसून येत आहे.
    राज्यात बहुचर्चित असलेल्या मतदारसंघा पैकी एक असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघात सध्या निवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे यंदाच्या वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा होती.ते गंगाखेड बाबतीत नेमकी काय भुमिका घेतात याकडेही अनेक उमेदवारांसह मतदारांच्याही नजरा या मतदारसंघाकडे लागल्या होत्या.परंतु सोमवारी पहाटे जरांगे यांनी आपला निवडणुक न  लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अर्ज उचलण्याच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजाकडून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी जरांगे यांनी केलेल्या आवहानाप्रमाणे आप आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.तर निवडणुकीतुन माघार घेण्याची आज सोमवार दि.४  रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत शेवटची वेळ होती . शेवटच्या दिवशी मराठा समाजातील ईच्छुकांसह  १३ उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानातुन माघार घेतल्याने आता  १२ उमेदवारांत लढाई होणार आहे.महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार विशाल विजयकुमार कदम, महायुती पुरस्कृत रासपाचे डॉ. रत्नाकर गुट्टे, वंचित बहुजन आघाडीचे माजी आ. सिताराम घनदाट मामा, जनहित लोकशाही पार्टीचे विठ्ठलराव रबदडे, राष्ट्रीय मराठा पार्टीचे माधव सोपान शिंदे, मनसेचे रुपेश देशमुख यांच्यासह विठ्ठल सोपान निरस, विशाल बालाजीराव कदम, अँड. संजीव देवराव प्रधान अलका विठ्ठल साखरे, नामदेव रामचंद्र गायकवाड, विष्णुदास शिवाजी भोसले,  असे १२ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहे. तर भगवान सानप, बालासाहेब निरस, श्रीकांत भोसले, डॉ. संजय कदम, डॉ. स्मिता कदम, जलील गुलाब पटेल, लक्ष्मण शिंदे, मुंजाजी जोगदंड, प्रवीण शिंदे, विशाल बबनराव कदम, शिरीन बेगम मो. शफिक, शेख हबीब शेख रसूल या १३ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याचे समजते.

You cannot copy content of this page