दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या दानपेटीवर चोरट्याचा डल्ला
पूर्णा शहरातील आनंदनगरातील घटना; दानपेटीत फोडून रोकड लांबवली;अज्ञात चोरट्याविरुद्ध घटनेची नोंद
पूर्णा/प्रतिनिधी
शहरातील उच्चभ्रु वसाहत असलेल्या आनंदनगरातील दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या दानपेटीवर अज्ञात चोरट्याने सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे.चोरट्यांनी दानपेटी फोडून पेटीतील रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या बाबतीत सविस्तर माहिती अशी की,पूर्णा शहरातील आनंदनगर आदर्श काॅलनी परीसर उच्चभ्रु वसाहत म्हणून परिचित आहे.यापरिसरात एक प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. दिवसरात्र येथे भाविकांची वर्दळ असते.सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका अज्ञात चोरट्याने मंदीराच्या दानपेटीला आपले लक्ष बनवले.चोरट्यांनी कोणत्यातरी लोखंडी रॉडने दानपेटीचे लाॅक त्याचे इंजिस तोडले,व दानपेटीत असलेली अंदाजे ६ ते ७ हजार रुपयांची नगदी रोकड लंपास केली. नेहमीप्रमाणे पहाटे ७ वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांना सदरील प्रकार पहावयास मिळाला.भाविकांनी मंदीरासाठी कार्य करणाऱ्या सेवेक-यांना बोलावून हा प्रकार निदर्शनास आणून दिला यानंतर घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना देण्यात आली.घटनास्थळी पो.नि.विलास गोबाडे, जमादार सपोउपनि अण्णा माने,पोकाॅ.शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.पोलीसांनी परिसरात रहिवाश्यांकडे असलेल्या सि.सी.टी.व्ही ची पहाणी केली सुरू केली आहे. मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास सदरील प्रकार घडल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.चोरट्यांनी गजबजलेल्या वस्तीतील मंदिराची दानपेटी फोडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.