परभणी(Parbhani);१५ हजारांची लाच घेताना महावितरणचे दोन लोकसेवक पकडले

Spread the love

परभणी लाचलुचपत विभागाची(Anti Corruption)मानवत(Manvat) येथे कारवाई;गुन्हा दाखल


परभणी(मानवत)/प्रतिनिधी


शेत शिवारातील बंद पडलेल्या रोहीत्राचा फेल्युअर रिपोर्ट देण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी करणा-या जिल्ह्यात मानवत येथिल महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यासह, कंत्राटी तंत्रज्ञास (दि.२६) नोव्हेंबर रोज मंगळवारी परभणी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई करत दोघांना गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील महावितरण कंपनीचे कृषी ग्राहक असलेले तक्रारदार शेतकरी यांच्या शेतातील बोअरवर विद्युत मोटार बसविलेली आहे. त्याला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र पावसाळ्या पासून बंद आहे. रोहित्र बंद असल्याचा रिपोर्ट मिळणे बाबत तक्रारदार यांनी मानवत महावितरण कंपनीच्या मोहमद तलहा यांना विनंती केली. यावर संबधीताने तक्रारदाराने २० हजार रुपयांची मागणी केली.तडजोडी अंती १५ हजार रुपये देण्याचे ठरल्या नंतर तक्रारदार यांनी परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली.कनिष्ठ अभियंता मोहमद तलाह यांनी ठरल्याप्रमाणे मंगळवारी १५ हजार रोख रक्कम कंत्राटी तंत्रज्ञ महेश कोल्हेकर यांच्याकडे देऊ केली.यावेळी कार्यवाही करण्यासाठी लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर, पोलिस निरीक्षक अलताफ अय्युब मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथील पथकाने घटनास्थळी छापा घालून महेश कोल्हेकर यांनी तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.त्याला लाचेच्या रक्कमेसह ताब्यात घेण्यात आले. मोहमद तलहा यालाही ताब्यात घेण्यात आले असून मानवत पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page