हुडहुडी;परभणीचा(Parbhani Weather)पारा उतरला
तापमान १० अंशाखाली;शेकोट्या पेटल्या; हुडहुडी वाढली
परभणी : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात शितलहरीने शिरकाव केला असुन तापमान १० अशांनी खाली आल्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरली आहे.बुधवार २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याचे किमान तापमान ९.५ अंश सेल्सीअस एवढे नोंदविल्या गेले.नोव्हेंबर महिन्यात मागील आठवडाभरापासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. किमान तापमान १० अंशाखाली आले आहे . मंगळवारी तापमान घटून ९.५ अंश सेल्सीअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्याची सरासरी नोव्हेंबर महिन्यात या कालावधी मध्ये किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सीअस असते. मात्र यावेळी नोव्हेंबर महिन्यात असलेल्या सरासरी तापमानाचा विचार केला तर सदरचे तापमान ३ अंशाने कमी झाले आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. या कालावधीत जिल्ह्यात सरासरी कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सीअस इतके असते. मात्र सध्या हे तापमान २८.३ अंश सेल्सीअस एवढे आहे. तापमान कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे मात्र नागरिकांना हुडहुडी भरत आहे. दिवसभर थंडी जाणवत आहे. थंडी पासून बचाव करण्यासाठी नागरीक उबदार कपड्यांचा सहारा घेत आहे. सकाळ, सायंकाळच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत. थंडीमुळे व्यायाम करणार्यांची संख्याही वाढली असून पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक घराबाहेर पडत आहेत. शहरातील व्यायाम शाळा, जीम फुल झाल्या आहेत. सुक्या मेव्याची मागणी देखील वाढली आहे