Breking’या’ विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणी, निवडणूक आयोगाचा निर्णय
नाशिक(प्रतिनिधी)
राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं. त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे.
सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना सूचना पत्र दिले आहे.नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना 1 लाख 41हजार 725 मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना 73 हजार 651 मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला 46 हजार 649 मते मिळाली आहेत.
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
बाळासाहेब थोरातांसह राजु शिंदे ही करणार फेर मतमोजणीसाठी अर्ज
ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतला आहे. त्यामुळं औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत. नियमानुसार पाच टक्के ईव्हीएमची फेर मतमोजणी होऊ शकते त्यासाठी शुल्क भरावा लागतो. ही सगळी प्रक्रिया पार पडून फेर मतमोजणीची मागणी करणार असल्याचं या उमेदवारांचे म्हणणं आहे. मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना दिल्याचं उमेदवारांनी सांगितले आहे.
बिडच्या परळीत हजारो मृतांचं मतदान..?
परळी मतदारसंघामध्ये 140 ते 150 बूथवरती मृत लोकांचं मतदान झालं असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहण्यात आलं आहे. अद्याप याबाबत निवडणूक आयोगाने कोणतही उत्तर दिलं नसल्याचं राजेसाहेब देशमुख यांनी सांगितलं आहे.