स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखेची कनेक्टीव्हीटी गुल
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
पूर्णेत खातेदारांची गैरसोय;फोन पे,गुगल पे सह अन्यसेवावरही परिणाम
पूर्णा(प्रतिनिधी)-
शहरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी राष्ट्रीयीकृत बँक म्हणून शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. परंतु, मागील दोन दिवसांपासून या शाखेमधील कनेक्टिव्हिटी गुल झाल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.कनेक्टीव्हीटीमुळे फोन पे,गुगल पे सह अन्यसेवावरही परिणाम झाला असून,अनेकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
पूर्णा शहरातील ५० ते ६० हजार लोकसंख्येसाठी राष्ट्रीयीकृत बँकेची एकमेव शाखा आहे. या शाखेत रेल्वेचे कर्मचारी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात खाते आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी तालुक्यातील १० ते ११ दत्तक गावांच्या शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात खाते आहे. त्यामुळे या बँकेमध्ये नेहमी पैसे काढण्यासाठी व शहरातील व्यापारीबांधवांसाठी आणि व्यवहारही याबँकेमार्फत केले जातात. परंतु, मागील काही दिवसांपासून या बँकेमध्ये तांत्रिक बिघाडामुळे कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे खातेदारांना पैसे उचलता येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. स्टेट बँकेच्या बरोबरीने पूर्णा शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. तरकाही शहरांमध्ये नागरी बँका कार्यरत आहेत. या बँकांमार्फत छोट्या-मोठ्या व्यवसायांना कर्ज दिले जाते. सोमवारी शहरातील नागरिकांनी स्टेट बँकेकडे विचारणा केली असता कनेक्टीव्हीटी नसल्याचे सांगण्यात आले असून, केवळ काऊंटरवरून व्यवहार सुरू होते. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होती. बँकेत नवीन काऊंटर उघडण्यात यावे, अशी मागणी नागरिक व खातेदारांमधून केली जात आहे. परंतु अद्यापही त्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तात्काळ वरिष्ठ अधिकारी यांनी नवीन काऊंटर उघडून खातेदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.