झिरोफाटा-पूर्णा-नांदेड रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडांचा विळखा
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
सा.बां.विभागाचे दुर्लक्ष;वाहन धारकांची गैरसोय;अपघाताचा धोका वाढला
पूर्णा(प्रतिनिधी)दि.२८ नोव्हेंबर २०२४
येथून झिरोफाटा,हट्टा ते औंढा हिंगोली तसेच नांदेडकडे जाणा-या पूर्णा- झिरोफाटा, पूर्णा-नांदेड राज्य रस्त्याकडेला सा.बां.विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांनी विळखा घातला असून, दोन्ही साईडच्या बाजूस वाढलेल्या झाडेझुडपेमुळे वाहतुकीची गैरसोय तर होतच आहे. शिवाय अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
झिरोफाटा-पूर्णा-नांदेड राज्य रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे.पुढे पिंपळा भत्या ते नाळेश्वर हद्दीपर्यंत करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे. एकीकडे हैदराबाद ते मुंबई तर हिंगोली- पूर्णा असा प्रवास केला जातो आणि वाहने दररोज ये-जा करतात. परंतु, रस्त्याचे काम झाल्या नंतर दोन्ही साईडने काटेरी कुंपण वाढले आहे. साईडपट्ट्या भरल्यानंतर त्या ठिकाणीच कुंपणांचा वेढा दिसून येत आहे. सध्या या भागात अनेक साखर कारखान्यांच्या वाहनांची रहदारी असून, येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाला साईट देताना या काटेरी कुंपणाचा अडथळा निर्माण होत आहे.
या राज्य रस्त्यावरील दोन्ही बाजूंची ही काटेरी कुंपण तत्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.