नव्या सालात उडणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार..!

Spread the love

फेब्रुवारी महिन्यात निवडणुकीची शक्यता;कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या लागल्या नजरा

पूर्णा(प्रतिनिधी)
सरत्या वर्षात लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभेच्याही निवडणुका  पार पडल्या.२०२५ नव्या सालात फेब्रुवारी,मार्च महिन्यात नगरपालिका, नगरपंचायत,महापालिका,जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीचा बार उडण्याचे दाट संकेत मिळत असल्याने विधानसभा निवडणुकीत आप आपल्या नेत्यांसाठी अंग झटकून काम केलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या  निवडणुकांचे डोहाळे लागले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
            कोरोना संक्रमण काळापासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला या-ना त्या कारणाने ब्रेक लागलेला होता.मागील दोन ते अडीच वर्षांपासुन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासका करवी सुरू आहे.परभणी जिल्ह्यातही (Municipal Corporation,Zilha parishad Election) नगरपालिका, महानगरपालीकेसह,जिल्हा परिषद, पंचायत समित्यां नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्यामुळे प्रशासकाची वर्णी लागलेली आहे.लोकसभा निवडणुकीपुर्वी या निवडणुका पार पडतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र कोरोना काळ व न्यायालयीन कारवाईत अडकलेल्या आरक्षण, वार्डरचना आदीं मुळे या निवडणुका प्रलंबित राहील्या.दरम्यान  प्रशासनाने तत्पूर्वी जोरदार तयारी करत निवडणुकी साठी प्रभाग रचना, सदस्य संख्येची तयारी देखील करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात निवडणुकांना मुहूर्त काही लागला नाही.आता राज्यातील लोकसभाविधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत.मागील अडीच वर्षांपासून नगरसेवक,जि.प.सदस्य, पं.स.सदस्य  बनण्याच्या आशेने काही जण कामाला लागले होते.मात्र या निवडणुका रेंगाळल्याने पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मोठा हिरमोड झाला आहे.नेते मंडळींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता इच्छुकांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे लागले आहे. मात्र या  निवडणुका होण्यासाठी २०२५ चे वर्ष उजाडेल असे काहीसे चित्र आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुका होतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांमधुन व्यक्त केला जात आहे. आता निवडणुका नक्कीच लागतील या आशेने पुन्हा एकदा इच्छुक उमेदवार गुढग्याला  बाशिंग बांधुन निवडणुकीची वाट पाहत आहेत.

You cannot copy content of this page