अ.भा.क्रासकंट्री स्पर्धेत पूर्णेच्या खेळाडुंचा सहभाग
पूर्णा/प्रतिनिधी
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
विद्यापीठ अलवस महाविद्यालय मुडबिदरी कर्नाटका येथे नुकतेच संपन्न झालेली अखिल भारतीय विद्यापीठ क्रॉसकन्ट्री स्पर्धेत पूर्णेतील मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कु. द्रौपदी ढोणे आणि कु. गायत्री कदम या दोन विद्यार्थ्यांनी 10 km धावणे क्रॉसकन्ट्री स्पर्धेत सहभाग नोंदविला. पूर्णा सारख्या ग्रामीण भागातून प्रतिभावंत खेळाडू निर्माण होत असून त्यांचा अकॅडमी तर्फे सन्मान करन्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार जगदीश जोगदंड हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक अनिल उकरंडे, शंकर गायकवाड, स्वराज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर बोकार, संपादक अतुल शहाणे आदी उपस्तिथ होते. या विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक प्रा.डॉ. महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडेमी तर्फे महाराष्ट्र पोलीस भर्ती, आर्मी भर्ती, रेल्वे पोलीस भर्ती, आदी वेगवेगळ्या भरतीचे फिजिकल मैदानी तयारी करून घेण्यात येते तर लेखी परीक्षेची स्वराज अकॅडेमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पूर्णा मार्फत केली जाते गेल्या पाच महिन्यात अकॅडमीचे तीन विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले असून नवीन बॅच एक तारखे पासून सुरु झाली आहे तसेच लहान विद्यार्थ्यां करिता मैदानी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले अशी माहिती मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. महेश जाधव यांनी या वेळी दिली.