शिवाजीराव देशमुख राहेरकर यांचं निधन
पूर्णा,/प्रतिनिधी
येथील अमृत नगर मधील शिवाजीराव धुंडीराज देशमुख राहेरकर (वय ७२) यांचे शनिवारी (ता. ३०) पूणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आळंदी येथे रविवारी (ता. १) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते उत्तम अभिनेते होते. काही मालीका व टेलीफ्लीम मध्ये त्यांनी चरित्र भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अनिरुद्ध देशमुख यांचे ते वडील तर जेष्ठ पत्रकार डॉ. हरिभाऊ पाटील यांचे ते भावजी होत.