कौतुकास्पद;वडापाव विक्रेत्याने सुरू केलायं मोफत’वर्तमानपत्र वाचनकट्टा’
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय
पूर्णेतील सोपानराव वेडे यांचा आदर्शवत उपक्रम
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील अल्पशिक्षित परंतु वाचनाची आवड असलेल्या,वडापावचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाची उपजीवीका भागवणा-या पूर्णा शहरातील सोपानराव वेडे यांनी पुर्णेकरांत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याहेतुने सर्वांसाठी दैनंदिन मोफत ‘वर्तमानपत्र वाचनकट्टा’ सुरू करुन समाजीक बांधीलकी जोपासत शहरवासीयांसाठी आदर्शवत उपक्रम सुरू केला आहे.येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आता दररोज वर्तमान पत्र वाचकांना मोफत वर्तमान पत्र वाचायला मिळणार आहेत.
पूर्णा येथील आंबेडकर पुतळा परिसरात योगेश वडापाव सेंटरचे संयोजक सोपान वेडे हे आपलं काम करत अनेक सामाजिक उपक्रम सतत राबवत असतात.यावेळी त्यांच्या कल्पनेतून त्यांनी शहरातील वाचकांसाठी मोफत सर्व प्रकारचे वर्तमानपत्र वाचनाची सोय उपलब्ध करून दिली आहे.शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात या ‘वाचनकट्याचे’ औपचारिक उद्घाटन पो.नि.विलास गोबाडे, रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे,मा.उपनगराध्यक्ष हाजीभाई कुरेशी,उत्तमभैया खंदारे,पत्रकार,विजय बगाटे,गजानन हिवरे,अंनिस बाबुमीया,अमृत कऱ्हाळे, महंमद शफी ,मिलिंद सोनकांबळे,संजय शिंदे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे आदीं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक गोबाडे यांनी सांगितले की, वाचनकट्टयातुन वाचन संस्कृती जोपासली जाणार आहे.हा उपक्रम स्तुत्य असुन सोपानराव वेडे सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सर्वांनी लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले पाहिजे असे ते म्हणाले.तर प्रकाशदादा कांबळे यांनी वाचनाने जिवन समृद्ध होते.त्यामुळे वेडे सारख्या व्यक्तीस समाजाने पाठबळ दिले पाहिजे असे ते म्हणाले.उत्तम खंदारे यांनी वाचन कट्टा उपक्रमाचे कौतूक करून अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमृत कऱ्हाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठीअतूल गवळी उमेश बाऱ्हाटे,प्रविण कनकुटे,यांच्या सह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.