परभणी;नानलपेठ पोलिसांची जुगार अड्डयावर धाड

Spread the love

________________________________________

साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त;एका महीलेसह ९ जणांविरुद्ध गुन्हा.

________________________________________

परभणी(प्रतिनिधी)

पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वाखाली नानलपेठ पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी २९ रोजी मध्यरात्री शहरातील मराठवाडा प्लॉट भागात एका महीलेच्या घरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड टाकून सुमारे ३ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला करत एका महीलेसह ९ जणांविरुद्ध गुरनं६६८/२०२४ कलम४,५ म.जु.का. अन्वय गुन्हा दाखल केला आहे.
परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट येथील लक्ष्मीबाई मुसळे यांच्या घरात तिर्रट नावाचा जुगार चालू असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. सदर माहितीवरुन नानलपेठ पोलीसांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री यशवंत काळे साहेबांचे नेतृत्वात कोणी सपोनि.चितांबर कामठेवाड, सपोनि.सुशांत किनगे, पो.अंमलदार सय्यद,आसाराम दवंडे,शोयब खान,संतोष सानप, भोसले यांच्या छापा टाकला.यावेळी पथकास घटनास्थळी ८ इसम गोलाकार बसुन तिर्रट नावाचा जुगार खेळतांना मिळून आले.पोलीसांनी संबंधीतांकडून रोख रक्कम मोबाईल आदीं जुगार साहित्य असे ३ लाख ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शनिवार ३० नोव्हेंबर रोजी पहाटे पोलीस अंमलदार सुधाकर कुटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शेख मुखतार शेख इस्माईल रा. रामनगर, रसुल खान ताज खान पठाण रा. मेहराज नगर, मोहम्मद जावेद मोहम्मद गफार बागवान रा. रामेश्वर प्लॉट ,सयद रफीयोदिन सय्यद वलीयोद्दीन रा. खाजा कॉलनी,तावक्कल उर्फ बाबा खान नजीर खान रा. खाजा कॉलनी,शेख मौसीन शेख सलीम रा. खाजा कॉलनी, मोहम्मद तौफीक मोहम्मद मुनवर बागवान रा. रेहमत नगर शालिमार फंकशन हॉल, शेख जावेद शेख अमीर रा. मदीना नगर तसेच जुगार अड्डा चालवणारी महीला नामें लक्ष्मीबाई दिलीप मुसळे मराठवाडा फ्लॉट परभणी अश्या ९ जणांविरुद्ध वर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास नानलपेठ पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page