पुर्णेत खा.संजय जाधवांच्या हस्ते ५१ फुटी रावणाचे दहन
राजे संभाजी मित्र मंडळाचा उपक्रम ;नयनरम्य दृश्य पहाण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला
पुर्णा ता.३(प्रतिनिधी)
विजयादशमी व दस-या निमीत्य पुर्णा शहरातील जुना मोंढा मैदानावर शिवसेना (उबाठाचे) उपनेते खासदार संजय उर्फ बंडु जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य आतीषबाजीत ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.हे नयनरम्य दृश्य नजरेत साठवून ठेवण्यासाठी पुर्णा शहरासह तालुक्यातील हजारों भाविकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.

पुर्णा शहरात शिवसेना व श्री. राजेसंभाजी नवरात्र महोत्सव समीतीच्या वतीने मागील २० वर्षांपासून भव्यदिव्य स्वरुपात फटाक्यांच्या प्रचंड आतीषबाजी सह ५१ फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्याची,तसेच विचारांचे सोने लुटण्याची अखंडित परंपरा सुरू आहे.(ता.२) गुरुवारी रात्री येथिल जुना मोंढा मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला शिवसेना (उबाठा) उपनेते, परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव,मा. जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव,व सुधाकर खराटे, उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले,तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे, शहरप्रमुख मुंजा भाऊ कदम,पुर्णा साखर संचालक भगवानराव धस, पवार दाजी,नगराध्यक्ष संतोष एकलारे, साहेब कदम,रौफ कुरेशी,रामप्रसाद रणेर,नगरसेवक श्याम कदम,युवासेनेचे बंडुअप्पा बनसोडे,विकास वैजवाडे यांच्यासह,पोलीस निरीक्षक विलास गोबाडे,डॉ.विनय वाघमारे,डॉ.हरिभाऊ पाटील, हिराजी भोसले,राजु अण्णा एकलारे,मनोज उबाळे,प्रा.गोविंद कदम, शिवराम भंगे,मुन्ना राठोड,लक्ष्मीकांत शिंदे,गजानन हिवरे,शंकर गलांडे,रवि भैय्या जैस्वाल,श्याम अजमेरा, शिवा पाथरकर,बालाजी वैद्य,रमेश ठाकूर,गोविंद सोलव, मुंजाजी कदम डॉ.देशमुख,डॉ. मेहंदळे,डॉ.जोंधळे, आदीं मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

भव्य स्वरुपातील रावणाची महाकाय प्रतिमा घडवण्या साठी हिंगोली येथिल कारागीर नंदुभाऊ बंबरुळे व त्यांचे सहकारी गेवराई येथील शाकेरभाई यांनी मागील आठ दिवसांपासून सतत परिश्रम घेतले.पुर्णेतील चित्रकार रवि बिछडे यांनी प्रतिमेची सजावट केली.

यावेळी खा.संजय जाधव यांनी उपस्थित जनसमुदायाला विजया दशमीच्या शुभेच्छा देत विचारांचे सोने लुटले.राज्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखों हेक्टरवरील पिकं उध्वस्त झाली यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. सत्ताधारी सरकारला रावणासारखा अहंकार झाला आहे.तो बाजूला ठेवून शासनाने सर्व निकष बाजुला ठेवून बळीराजाला सावरण्यासाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर द्यावी, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून,राज्य व केंद्र शासनाच्या कारभाराचा खुपसून समाचार घेतला.प्रसंगी गंगाप्रसाद आणेराव यांनी जनतेशी संवाद साधला.यानंतर हजारोंच्या संख्येने जमलेल्या पुरवणे करांच्या उपस्थितीत महाकाय रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश जोगदंड, जगन्नाथ कदम तर आभार आयोजक मुंजाभाऊ कदम,यांनी मांडले.