बिड-लासलगांव हत्याकांडाची CBI चौकशी करा-पुर्णेत वाल्मीकी आर्मीचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन

Spread the love

पूर्णा (ता.३० सप्टेंबर)
बिड व लासलगांव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर वाल्मीकी आर्मी तर्फे पुर्णा पोलीसांना मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या घटनेत दोन जणांचा निर्दयीपणे खून झाल्याने समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बिड येथिल पत्रकार देवेंद्रसिंह ढाका उर्फ बुन्ना यांचा बिड येथे तर लासलगांव येथे कुंदन सिंग चावरीया यांचा खून झाला.घटनेने  महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातील वाल्मीकी समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून,त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने  तातडीने पावले उचलत CBI चौकशी स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या :1. बिड व लासलगाव हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करून SIT मार्फत चौकशी व्हावी.

2. सर्व्हिस फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा.

3. पीडित कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.

4. वारसांना शासनात कायमस्वरूपी नोकरी द्यावी.

5. वरील मागण्यांवर त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पुर्णा पोलीस ठाण्याचे स. निरीक्षक गजानन पाटील,यांच्यामार्फत सरकारला पाठविण्यात आले असून, या वेळी वाळमीकी आर्मीचे अध्यक्ष डॉ. सुमित नंदलाल चावरे, विजय सौदा, मनोज सौदा, शिवा सौदा, सुरेश पोहाल, प्रकाश गायकवा, विनोद गायकवाड,रोहन सौदा यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.या प्रकरणात शासनाने त्वरीत दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका वाल्मीकी आर्मीने घेतली आहे.

You cannot copy content of this page