चड्डी बनियान गँगचा पोलीस ठाण्यासमोर रात्रभर धुमाकूळ १० ते १२ घरं फोडली चार लाखांचा मुद्देमाल लंपास

Spread the love

चड्डी बनियान गँगचा पोलीस ठाण्यासमोर रात्रभर धुमाकूळ १० ते १२ घरं फोडली चार लाखांचा मुद्देमाल लंपास;पोलीस अधिक्षकांच्या भुमिकेकडे लक्ष;बोरी व परिसरात भीतीचे वातावरण

परभणी(बोरी)/प्रतिनिधी
येथील पोलीस स्टेशनच्या समोरच्या गल्लीत चड्रडी बनियान गँगने गुरूवारी(ता.२१) रोजी रात्री अक्षरशः धुमाकूळ घालत एकानंतर एक अशा दहा ते बारा घरांमध्ये प्रवेश केला.तसेच ऐन पोलीस ठाण्यापासून लगत असलेल्या अनिल वसेकर यांच्या घरातील कपाटाचे कुलुप तोडून तीन ते चार लाखाची चोरी केल्याची घटना उघडकीस आल्याने बोरी पोलीसांच्या कार्यक्षमतेचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत.चोरटे रात्रभर चोऱ्या करत होते तरी पोलिसांना याची खबर कशी लागली नाही.पोलीसांची चोरट्यांशी मिलीभगत तर नाही ना अशा प्रकारची जोरदार चर्चा बोरी गावात रंगली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या प्रकारानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आता काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पेठ गल्ली, चौधरी गल्ली, माळी गल्ली, गुरव गल्ली आदी ठिकाणी चोरट्यांच्या चड्डी बनियान गँगच्या टोळक्याने रात्रभर धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तीन ते चार लाखाचा ऐवज लंपास केल्याचे अनिल वसेकर यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सकाळी ठसे पथक व एलसीबी चे पोलीस अधिकारी व बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, पोलीस उपनिरीक्षक एस एन थोरवे व काही कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली.

हे चोर गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सहा ते सात चोरटे चड्डी गॅंग असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी पोलिसांनी तात्काळ चोरट्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page