परभणी शहरातील जिंतूर रोडवर ३ दुकाने जळून खाक

Spread the love

लाखोंचे नुकसान;जीवितहानी टळली; अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली

परभणी ता.२२/प्रतिनिधी
शहरातील जिंतूर रस्ता परिसरातील दत्तनगर येथील दुकानांना शुक्रवारी(ता.२२)पहाटे अचानक आग लागून तीन दुकाने जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.

शहरातील जिंतूर रोड परिसरातील दत्तनगर येथे शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची माहिती अजित लिंबाळकर यांनी अग्निशमन कार्यालयाला कळविली. माहिती मिळतात अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला व आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेत दत्तनगर येथील ओंकार मोबाईल शॉपी, साक्षी जनरल स्टोअर आणि सौंदर्य ब्युटी पार्लर हे तीन दुकाने पूर्ण जळून खाक झाली. ही कारवाई अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मार्गदर्शनात अग्निशामक जवान मदन जाधव, सय्यद नजीम, वाहन चालक वसीम अखिल अहमद यांनी केली. दरम्यान मागील काही दिवसांपासून शहरात आगीच्या घटनाात वाढ झाली आहे. वेळेत व तात्काळ अग्निशमन सेवा मिळण्यासाठी १०१ या टोल फ्री क्रमांकवर किंवा अग्निशमन केंद्र, अपना कॉर्नर येथील ०२४५२ – २२३१०१ या लँडलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर राठोड यांनी केले आहे.

You cannot copy content of this page