नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाळासाहेबांचा अकोला पॅटर्न राज्यात राबवा – सुजातदादा आंबेडकर
परळी वै. ता.३०( प्रतिनिधी). नुकत्याच झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात राबविलेला मदतीचा पॅटर्न राज्य सरकारने अमलात आणावा व तातडीने नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना पंधरा हजार रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजातदादा आंबेडकर यांनी केली आहे. ते परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य एल्गार महा सभेत बोलत होते.
वंचित बहुजन आघाडी परळी तालुक्याच्या वतीने शहरातील श्रद्धा मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या भव्य एल्गार सभेच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महासचिव प्रा. किसन चव्हाण सर, राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद सर, बीड जिल्हा अध्यक्ष पूर्व शैलेश भाऊ कांबळे, जिल्हाध्यक्ष पश्चिम, अजय सरवदे ,सचिन उजगरे ,धम्मानंद साळवे, अंकुशराव जाधव, भारत तांगडे बालासाहेब जगतकर आदी मान्यवर उपस्थित होते. ता. अध्यक्ष गौतम साळवे, युवक ता. अध्यक्ष राजेश सरवदे यांनी या सभेचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना युवा नेते सुजातदादा आंबेडकर म्हणाले की, सध्या सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे. पूरग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यामध्ये प्रथम तातडीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली होती. व त्यानंतर पंचनामे झाल्यानंतर जे काही मदत राज्य शासनाच्या वतीने दिले जाणार आहे ती शासनाने त्या ठिकाणी दिली. तशाच प्रकारे सध्या प्रचंड संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अगोदर बीडजिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या खात्यावर 15 हजार रुपये जमा करावेत व त्यानंतर पंचनामे झाल्यानंतर देण्यात येणारी मदत द्यावी.अशा कठीण परिस्थितीत बँका, पतसंस्था आणि खाजगी सावकारांनी माणुसकी दाखविण्याचे गरज आहे. अन्यथा आमचे कार्यकर्ते माणुसकी विसरतील असा इशाराही त्यांनी दिला. आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जे विधान केले होते त्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. तसेच जनतेचे पैसे जनतेवरच खर्च झाले पाहिजेत. मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी स्वतःच्या फोटोवर खर्च करू नये असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. याच सभेत मुस्लिम समाजाचे युवा नेते शेख शाकेर अहमद, बंजारा समाज युवा नेते विकास पवार, वंजारी समाजाचे रवी मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते जाहीर पक्ष प्रवेश केला.
या सभेला निमंत्रक म्हणून ज्ञानेश्वर गीते, प्रेम जगतकर,धम्मानंद क्षीरसागर, भास्कर नावंदे, सिद्धोधन आचार्य, अवि मुंडे, विजय झिंजुर्डे, सुभाष रोडे, नंदकुमार सावंत, संदीप ताटे, प्रमोद रोडे, अमोल किरवले, रखमाजी जगताप, आदर्श जंगले आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेला बीड येथून सुजातदादा आंबेडकर यांना येण्यास उशीर झाला तरीही हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसेंजितजित रोडे यांनी केले तर आभार धम्मानंद क्षीरसागर यांनी केले. सुजातदादा आंबेडकर यांच्या या सभेमुळे परळी शहरात वातावरण वंचितमय झाल्याचे दिसून येत होते.