दांडिया म्हणजे समाजातील एकतेची भावना निर्माण करणारा महोत्सव- विनोद सामत

Spread the love

तेली समाज दांडिया महोत्सवात वैद्यनाथ बॅकेचे चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते सपत्नीक आरती संपन्न

परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)
नवरात्रीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर समाजात एकतेची आणि सामूहिक आनंदाची भावना निर्माण करणारा असल्याचे प्रतिपादन वैद्यनाथ बॅकेचे चेअरमन विनोद सामत यांनी केले. ते येथील तेली समाजाच्या वतीने दांडिया महोत्सवात सोमवारी (दि.२९) चेअरमन विनोद सामत यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी बोलत होते.

येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनी मंदिरात तेली समाजाच्या वतीने तेली समाज सार्वजनिक दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया महोत्सवात वैद्यनाथ बॅकेचे चेअरमन विनोद सेठ सामत यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. यावेळी तेली समाज सार्वजनिक दांडिया उत्सव समितीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच श्री शनी मंदिर देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विनोद सामत म्हणाले की,

नवरात्रीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर समाजात एकतेची आणि सामूहिक आनंदाची भावना निर्माण करणारा आहे. पारंपरिक वेशभूषा, सजीव संगीत आणि नृत्य यांच्या संगमातून दांडिया महोत्सव जीवनात नवचैतन्य निर्माण करतो. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर फुटके, छगन आप्पा क्षीरसागर, तुळशीदास सालमोटे, चंद्रशेखर फुटके, ओम सोनटक्के, प्रा मधुकर शिंदे, मलिकार्जुन साखरे, नागनाथ आप्पा भाग्यवंत, शिवशंकर जठार, विनोद आळणे तेली समाज दांडिया उत्सव समितीचे अध्यक्ष युवक नेते पवन फुटके, सोमनाथ वाघमारे, अशोक रोकडे, शिवराज सोनटक्के, राजकुमार भाग्यवंत, सचिन लासे, सतिष फुटके, राहूल क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, दिपक साखरे, ईश्वर राऊत, रवी अन्नपुर्णे, शंकर कौले, संदेश क्षीरसागर, ॠषी फकिरे, ओमकार नाईक, प्रदीप पिंपळे, प्रसाद जठार उपस्थित होते.

You cannot copy content of this page