SBI बँकेतून शेतकऱ्यांची रोकड पळवणारे पूर्णा पोलिसांच्या ताब्यात
३ महीन्यांपुर्वी घडली होती घटना;१ लाख ९० हजारांची केली होती चोर
पूर्णा ता.१७(प्रतिनिधी)
सुमारे ३ महीन्यांपुर्वी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत व्यवहार करण्यासाठी आलेल्या देवराव बुलंगे (वय ४२)रा.चांगेफळ ता.पूर्णा येथील शेतकऱ्याचे बँकेच्या कॅश काउंटरवर ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये चोरट्यांनी परस्पर लांबवल्याची घटना घडली होती. सदरील गुन्ह्यातील चोरट्यांना पूर्णा पोलिसांनी यवतमाळ येथून ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पूर्णा तालुक्यातील चांगेफळ येथील रहिवासी असलेले देवराव मारोतराव बुलंगे यांच्या घरी लग्नकार्य असल्याने तुर विकुन आलेले दिड लाख तसेच मित्राकडून घेतलेले ४० हजार असे १ लाख ९०हजार रुपये घेऊन खात्यातील रक्कम काढण्या साठी स्टेट बँकेच्या पूर्णा शाखेत ९ एप्रिल रोजी दुपारी बँकेत आले होते.दरम्यान त्यांच्या जवळ पिशवीत असलेली १ लाख ९० हजारांची रोकड बँकेच्या कॅश काऊंटर वर ठेऊन खात्यावरील रक्कम काढण्या साठी चेक लिहीत असताना.त्यांच्या पाठी मागे उभे असलेल्या एका अज्ञात चोरट्यांने पिशवी सह रोकड लंपास केली.हा सर्व प्रकार बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला होता.दरम्यान याप्रकरणी पूर्णा पोलिसांत गुरनं १२०/२०२५नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच संबंधित चोरट्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीसांच्या हद्दीत याच पद्धतीने बँकेतून रोकड लंपास केली होती .तेथिल पोलीसांनी अश्वीन जैन्या काळे (वय२०),भगीरथ जैन्या काळे(वय२९) विक्की अवजा काळे(वय२०)तीघे रा.कोंबली ता. कर्जत जि.अहील्यानगर तसेच मारोती बापुराव धोत्रे(वय५०)रा.वसारी(दापुरी खु)पोस्टे शिरपुर ता.रिसोड जि.वाशीम यास निष्पन्न करुन ताब्यात घेतले होते.पोलीस कस्टडी दरम्यान त्यांनी पुर्णा येथे चोरी केल्याचे कबुली जबाब दिला होता.सदरील चोरटे हे यवतमाळ जिल्हा कारागृहात असताना पूर्णा पोलिसांनी पुर्णेतील घटनेचे सिसीटीव्ही फूटेज तपासत चोरट्यांची खातरजमा करून मा.पूर्णा न्यायालयाच्या परवानगीने (ता.१५) रोजी पूर्णा पोलीस ठाण्याचे पो.नि.विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गजानन पाटील,सपोउपनि.रमाकांत तोटेवाड, पोकाॅ. माधव अक्कलवाड,सुरेश चव्हाण,भिमराव दुधमल यांचे पथक यवतमाळ येथे गेले होते.पथकाने ४ चोरट्यांना ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे. पुढील तपास सपोनि गजानन पाटील हे करत आहेत.