ग्राम रोजगार सेवकांचे पुर्णा पंचायत समितीसमोर धरणेगटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

Spread the love

पूर्णा, ता. २२ (प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्राम रोजगार सेवकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मागील २२ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू ठेवले असून, बुधवारी (ता. २२) पंचायत समिती कार्यालय परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यभर सुमारे २७ हजार ग्राम रोजगार सेवक कार्यरत आहेत. मात्र, विविध मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे या सेवकांनी राज्यव्यापी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. पूर्णा तालुक्यातील सुमारे ८० ग्राम रोजगार सेवकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवत कामबंद ठेवले आहे.राज्य सरकारने जाहीर केलेल्या १० हजार रुपयांच्या अनुदानाची रखडलेली अंमलबजावणी तातडीने सुरू करावी, ग्राम रोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचारी दर्जा द्यावा तसेच ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतलेल्या मानधनाच्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करून मानधन देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रांगणात धरणे आंदोलन करत ग्राम रोजगार सेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ देशमुख, नंदकुमार सोनटक्के, परभणी ग्रामीण तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव गमे, पूर्णा तालुकाध्यक्ष शेख जाणीमिया यांच्यासह बळीराम दुबे, अनिरुद्ध कराळे, उद्धव कदम, दौलत देवकते, तुळशीराम जाधव, राम गाडे, प्रवीण दुधाटे, दत्ता दुधाटे, गणपती शेळके, मारोतराव दाभाडे, शेख मोहसीन, शेख रजाक, ज्ञानदेव जाधव, बालासाहेब शिंदे, शालिग्राम पारखे, सटवाजी भोसले, नागोराव शिंदे, विलास राऊत, सुनील हत्ती, आंबिरे रुपेश धुमाळे, मारुती दाभाडे, अच्युत बोबडे, गौतम वाटोडे, गजानन नवघरे, नवनाथ स्वामी, अर्जुन रोकडे, पुंडलिक इंगोले, अच्युत भुसारे, गणेश गाय गोधनी, पिराजी काळबांडे, अनंत काळबांडे, अंगद बोकारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान, शासनाने तातडीने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्राम रोजगार सेवकांनी दिला आहे.

You cannot copy content of this page