महसूल व पुरवठा विभागाचे आवहान;राशन हवे! तर ई-केवायसी करा
मुदतीत ईकेवायसी करुन घेणे प्रशासनाने काढले प्रसिद्धीपत्रक
पूर्णा ता.१७(प्रतिनिधी)
गोरगरीब नागरिकांना शासनाकडून मोफत धान्य व्यवस्था सुरू आहे; मात्र यात चुकीच्या लाभार्थ्यांना राशन जात असल्याची भनक शासनाला लागली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच शासनाच्या योजनेचा लाभ व्हावा, याकरिता शासन स्तरावरून ई-केवायसीचे बंधन दिले आहे; मात्र तब्बल वर्षभरानंतरही पूर्णा तालुक्यात हजारो लाभार्थ्यांनी केवायसीकडे पाठ दाखविली आहे. स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई-केवायसीची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे.जिल्हा पुरवठा विभाग अंतर्गत वारंवार मुदतवाढ देऊनही पूर्णा तालुक्यात १ लाख २७ हजार १३५ लाभार्थ्यांपैकी १ लाख ४ हजार ७४२ लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. यापैकी एकूण ९६ हजार ७०२ ईकेवायसी मंजूर करण्यात आलेल्या आहेत. पूर्णा तालुक्याची ईकेवायसी ७६.८८ टक्के झालेली असून २३.१२ ईकेवायसी शिल्लक आहे.
महसूल प्रशासनाने केले आहे आवाहन…
ई-केवायसी करताना किंवा स्थानिक राशन दुकानात ई-पॉस मशीनमध्ये काही तांत्रिक समस्या असल्यास थेट अन्नपुरवठा विभाग किंवा तहसीलदार पूर्णा यांच्याशी संपर्क साथण्याचे आवाहन तहसीलदार श्री. माधवराव बोथीकर व पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री. सतीश नाईक यांनी केले आहे.
स्वतःच्या मोबाईलमधूनही होणार ई-केवायसी…
काही लाभार्थी कामानिमित्त बाहेर जिल्ह्यात गेले असतील तर त्यांनी मोबाईलमध्ये मेरा ई-केवायसी अॅप डाऊनलोड करून त्यातून स्वतःची ई-केवायसी करता येते.
तर मग धान्य मिळणार नाही.?
रेशन कार्ड KYC ही केवळ एक सरकारी प्रक्रिया नाही तर कोट्यवधी गरीब कुटुंबांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे. सरकारने या प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ आणि संधी दिल्या आहेत. आता प्रत्येक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे की त्यांनी लगेच KYC पूर्ण करावी. योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि पात्र लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे विलंबन करता आजच आपली KYC प्रक्रिया पूर्ण करा. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. अशा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून शासनाच्या धोरणातून अन्नधान्य मिळणार नसून त्यांचे नाव सुद्धा कमी करण्यात येणार असल्याचे तालुका व जिल्हा अन्नपुरवठा विभागाने सुचविले आहे.