जनावरांची खरेदी-विक्री बंद;पूर्णेच्या आठवडी बाजारात शुकशुकाट
कुरेशी समाजातील व्यापाऱ्यांनी बाजारात पाठ फिरवल्याचा परिणाम
पूर्णा ता.१९(प्रतिनिधी)
सरकारने गोवंश हत्या कायदा लागू केल्यापासून खुरेशी समाजावर जागोजागी हल्ले होत आहेत.याप्रकारामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.खुरेशी समाज ने महाराष्ट्रभर जनावरे खरेदी विक्री व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला.या राज्यव्यापी आंदोलनात पूर्णा शहरासह तालुक्यातील कुरेशी समाज बांधवांनी सहभागी होत शहरात दर शनिवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजारात खरेदी विक्री बंद केली.यामुळे बाजारात शुकशुकाट दिसून आला.
परभणी जिल्ह्यात देखील कुरेशी समाजातील व्यापा-यांवर गोरक्षक दलाकडून जागोजागी होत असलेले हल्ले तसेच पोलीस प्रशासनाकडून होणारे गुन्हे या विरोधात (Quraish Community) समाज बांधवांची परभणी येथे एक महत्त्वापुर्ण बैठक पार पडली.जिल्ह्यातील कुरेशी बांधवांनी गुरुवार ता.१७ पासुन सर्व तालुक्यातील बाजारात होणारा जनावरांचा व्यापार करणार नसल्याचा निर्णय याबैठकीत घेण्यात आला.
पूर्णा शहरात दर शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो.मात्र कुरेशी समाज बांधवांनी जनावरे खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याने जनावरांच्या आठवडी बाजारावर याचे परिणाम पहावयास मिळाला.शेतकरी व खाटीक यांची एक नाळ आहे जे शेतकऱ्यांचे भाकड जनावरे असतात जे दूध देत नाही काम करत नाही हे फक्त खाटीक शिवाय विकत कोणीच घेत नाही व कायद्याने मान्यता प्राप्त त्या जनावरांना हे पैसे देऊन जनावरे खरेदी करतात मात्र काही संघटनेचे लोक खाटीकांना मारहाण करून त्यांच्या पासून पैसे घेतात व रीतसर कागदपत्र असताना देखील पोलीस प्रशासनाकडून देखील वाहन तसेच पशुधन जप्त करून गुन्हे नोंदविण्यात येत आहेत.यामुळे कुरेशी समाजातील व्यापारी तसेच शेतकरी शासनाच्या या निर्णयाने आर्थिक परिस्थितीत सापडल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शनिवार आठवडी बाजारात शेतकरी वर्गातून उमटल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.या निर्णयाच्या विरोधात शासनाने ठोस अशी पावले उचलून शेतकऱ्याची जी वृद्ध जनावरे आहेत ती कशाप्रकारे खरेदी विक्री केली जाईल याचाही निर्णय घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.