लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

परळी वैजनाथ (दि.१५) – लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले होते.

प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड आणि ग्रंथपाल श्री. सिद्धेश्वर कोकाट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी वाचनाचे वैयक्तिक विकासातले स्थान, तसेच ज्ञानसंपादन आणि चिंतनक्षमतेसाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. यल्लावाड यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सल्ला दिला की, “वाचन ही केवळ सवय नसून ती विचारप्रक्रिया घडवणारी शक्ती आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे.” असं सांगितलेअध्यक्षीय समारोपात प्राचार्या डॉ. विद्या देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनातून संशोधनाची दिशा मिळवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “वाचन हे नव्या कल्पनांचे मूळ आहे; संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी वाचन संस्कृतीचा अंगीकार आवश्यक आहे.”
प्रा. डॉ. विना भांगे यांनी विद्यार्थ्यांना ‘दररोज वाचनाची सवय लावूया’ अशी शपथ दिली व आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण फुटके यांनी केले.या प्रसंगी प्रा. प्रविण नव्हाडे, प्रा. अशोक पवार, प्रा. आशिलता शिंदे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.












