लक्ष्मीकांत शिंदे राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई येथील युवा प्रतिष्ठान आयोजित कर्मवीर अॅड.एकनाथ आव्हाड (जीजा ) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराने पूर्णा येथील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत शिंदे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे..
अंबेजोगाई येथे मागील अनेक वर्षांपासून अॅड.एकनाथ आव्हाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण केले जाते. समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी समाजकार्य पाहून पुरस्कार दिला जातो.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मिलिंद आव्हाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विजय कुमठेकर, अशोक पालके, प्रशांत दहिफळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी अॅड.एकनाथ आव्हाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार यावेळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पूर्णेतील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत शिंदे यांचा सपत्नीक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक पालके यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ.कुमठेकर म्हणाले की,.कोणत्याही समाजाला ज्ञान हे आकाशाची उंची गाठायला शिकविते.ज्ञान नसणारा समाज अंध: काराच्या य पुं गात वावरत असतो.समाजाची प्रगती ही आपल्यातील जळमटांना बाहेर फेकायला शिका.असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत रेखा सरवदे, हनुमंत गायकवाड, विजय कांबळे, दशरथ कांबळे, दत्ता पालके, दिपक पालके, महेश जोगदंड इत्यादींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. आभार उदार यांनी केले.