परळीच्या चेतन सौंदळे भुमीपुत्र गौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

राजस्थान राज्याचे महामहीम राजपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण;सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याचा सन्मान

परळी वैजनाथ ता.२६(प्रतिनिधी)महाराष्ट्रातील लोकमत समुहाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्रतिभासंपन्न,कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचा भूमीपूत्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.(ता.२३) रोजी परळी वैजनाथ येथील भुमिपुत्र नगरसेवक नितीन सौंदळे यांना नुकतेच एका कार्यक्रमात राजस्थान राज्याचे राज्यपाल महामहिम मा.श्री.हरीभाऊ बागडे(नाना) यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.   
सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात तसेच ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीचे सुपुत्र नगरसेवक चेतन सौंदळे यांच्यासह बीड जिल्हयातील भूमिपुत्रांना शनिवार दि.२३ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, एडिटर इन चीफ लोकमत मीडिया श्री.राजेंद्रजी दर्डा व लोकमत छत्रपती संभाजी नगर आवृत्ती चे संपादक श्री. नंदकिशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

You cannot copy content of this page