व्यसनाचा शेवट विनाशाकडे जातो, त्यामुळे तरुणांनी व्यसनमुक्त रहावे-पो. नि.धनंजय ढोणे

Spread the love

परळी शहरातील सिद्धार्थनगर येथिल त्रिशरण बौद्ध विहारात व्यसनमुक्ती कार्यक्रम

परळी ता.२६(प्रतिनिधी);कोणत्याही व्यसनाचा शेवट हा विनाशाकडे जातो तसेच स्वतःबरोबर कुटुंबाचेही प्रचंड नुकसान होते. या संकटातून बाहेर येण्यासाठी तरुणांनी व्यसनमुक्त राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पो.नि. धनंजय ढोणे यांनी केले.

परळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समीतीच्या वतीने त्रिशरण बौद्ध विहारात सिद्धार्थ नगर मध्ये (ता.२५) रोजी आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव ताटे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद घाडगे, डी.जी.मस्के, रानबा गायकवाड, वैजनाथ गायकवाड,संजय मस्के, संयोजक गौतम साळवे आदीं उपस्थित होते.पुढे बोलताना पो.नि.ढोणे म्हणाले की, व्यसनापासून दूर राहून नवयुवकांनी अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.वाईट मित्रांपेक्षा चांगले मित्र जोडा असे आवाहनही त्यांनी केले.प्रसंगी माधवराव ताटे,डी.डी.जी.मस्के,मिलिंदराव घाडगे वैजनाथ गायकवाड, यांनी आपले विचार मांडले. यावेळी समाज भूषण पुरस्कार माधवराव ताटे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार पत्रकार वैजनाथ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास विजय हजारे,कैलास तरकसे, सिद्धार्थ साळवे, अनिल सोनवणे, विकास गायकवाड,राम मुंडे, समाधान कांबळे,नंदू गायकवाड, किशोर बहादुरे, अशोक ढोकळे, अनिल कांबळे,आकाश गायकवाड, मंगेश मस्के,सनी तरकसे, बादल घाडगे,विशाल गायकवाड,भाऊराव ताल्डे,अजय पोटभरे,ओमकार कस्बे, आनंदराज साळवे,सुमित साळवे, अविनाश सुरवसे,अमोल सावंत, सुदर्शन कांबळे, अतुल मुंडे, तुळशीराम वैतागे, सनी चव्हाण, जितेंद्र जाधव, दिपक बहादुरे,मिलिंदराज साळवे,बाळा घाडगे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page