२३ लाखांची केबल चोरी उघड; दोन आरोपी जेरबंद!
LCB परभणीची पोखरणी परिसरात मोठी कारवाई; चोरीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त
परभणी, ता. २९ (प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोखर्णी शिवारात सापळा रचून दोन केबल चोरांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून तब्बल २३ लाख रुपये किंमतीची चोरीची केबल वायर जप्त करण्यात आल्याची मोठी कारवाई करण्यात आली असून, चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.. या कारवाईत जालना जिल्ह्यातील चोरीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत IPS यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शाखेचे पो. नि.गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. चंदनसिंह परिहार, पो.अं. रामकीशन काळे, गोविंद वड, देविदास बुकरे, संदीप चौरे आणि महारुद्र सपकाळ यांच्या पथकाने २८ ऑगस्ट रोजी पोखर्णी परिसरात काही इसमांना चोरीची केबल वायर घेऊन वाहतूक करीत असताना रं बाबू अण्णासाहेब शिंदे आणि दिलीप अण्णासाहेब शिंदे, दोघेही रा. पोखरणी, जि. परभणी, यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडील केबल वायर चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांचेकडून तब्बल २३ लाख रुपयांचा केबल वायरचा मुद्देमाल जप्त केला.चौकशीत सदर चोरी जालना जिल्ह्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे उघडकीस आले आहे.समोर आले. चोरीच्या मुद्देमालासह पुढील कार्यवाहीसाठी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ३६६/२०२६, कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये दाखल करून हजर करण्यात आले आहे









